जनतेच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडी निश्चित प्रयत्न करेल
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा विश्वास
शिरोळ:राम आवळे
दि .१४ :गणपतराव पाटील यांनी केलेल्या विकासात्मक कामावर जनतेचा विश्वास आहे. आमदार झाल्यानंतर विश्वासाच्या बळावर प्रामाणिकपणे शिरोळ मतदार संघात विकास कामे होतील. होणाऱ्या विकास कामात टक्केवारी घेणार नाही. कोणतीही दडपशाही राहणार नाही अशी खात्री देतो. महाराष्ट्रातील राजकारणात विचारांची घसरण झाली आहे. हे थांबवण्यासाठी गणपतराव पाटील यांना विधानसभेत पाठविण्याची गरज आहे. सुसंस्कृत सुराज्य निर्माण करायचे आहे. यासाठी जनतेच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडी सरकार निश्चित प्रयत्न करेल, असा विश्वास खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केला.
दत्तवाड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीमंत कर्णसिंग दौलतराव घोरपडे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. महिलांनी औक्षण करून गणपतराव पाटील यांचे स्वागत केले. पदयात्रे वेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली.
ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निरंजन टकले म्हणाले, महाराष्ट्रात जातीय विष पसरविण्याचे काम होत आहे. ही आमची परंपरा नाही. ही निवडणूक सरकार बदलण्यासाठी नसून या राज्याचा इतिहास बदलवणारी आहे. जबतक नरेंद्र मोदी एक है, तो सारे भ्रष्टाचारी सेफ है अशी देशाची अवस्था झाली आहे. सामान्य जनतेने उन्मत्त सरकार उधळवून लावलेले आहे. हीच आमची परंपरा आहे. त्यामुळे महायुतीचा उन्मत्त झालेला बैल आम्ही कोल्हापुरात रोखू.
भूषणसिंह राजे होळकर महाराज म्हणाले, गेल्या काही वर्षात राजकीय स्थिती पाहिली तर सामान्य जनतेला न्याय मिळत नाही. पण दमदाटी केली तर खपवून घेतले जाणार नाही. शिवरायांचा विचार सोबत घेऊन काम करणाऱ्या महाविकास आघाडीसोबत राहावे.
गणपतराव पाटील यांना सामान्य जनतेविषयी कळवळा आहे. स्वाभिमान टिकवण्यासाठी ही निवडणूक असून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याची गरज आहे.
कॉ आप्पा पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसाचे मूलभूत प्रश्न बाजूला गेले आहेत. एवढ्या खालचे राजकारण यापूर्वी कधी झाले नव्हते. विद्यमान आमदारांनी तालुका, गावचे वळण पुसून टाकले आहे. विकासकामे केली म्हणजे आमच्यावर मेहेरबानी केली नाही. तुमच्या लाडक्या बहिणी 1500 रुपये साठी संसार करत नाहीत, त्यांच्या सुरक्षितता, रोजगाराचे काय? तुमची कोणती विचारधारा आहे? महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या बाजूने आहात का? हे स्पष्ट करावे.गणपतराव पाटील यांनी मनोगतातून शिरोळ तालुक्याचे व्हिजन विस्तृतपणे सांगून निवडून देण्याचे आवाहन केले.
भवानीसिंह घोरपडे सरकार, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, महादेवराव धनवडे, स्नेहा देसाई, दिगंबर सकट, संजय भंडारे आदींनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर आभार सुरज शिंगे यांनी मानले.
यावेळी ठाकरे शिवसेना सरचिटणीस चंगेजखान पठाण, शिरोळ तालुका संपर्कप्रमुख बाजीराव मालुसरे, मधुकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अश्विनीताई माने, मिनाज जमादार, आण्णाप्पा सिदनाळे, महेंद्र बागे, राजू आवळे, बसगोंडा पाटील, उदय पाटील, स्वाती सासणे, बंटी देसाई, गायत्री कुरुंदवाडे, संगीता झुणके, संगीता पाटील, सुरेश दळवी, संजय माने, दौलत माने, देवराज पाटील, राजू सुळकुडे, बाबुराव पोवार, सुरज शिंगे, कु. बुशरा खोंदू, राहुल कांबळे, विक्रमसिंह जगदाळे, अनिरुद्ध कांबळे, बाबासाहेब नदाफ, वसंतराव देसाई, कृष्णवर्धन कलगी यांच्यासह मविआ व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.