संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था-२०२४” या पुरस्काराने सन्मानित.

कोल्हापूर :सलीम मुल्ला 

दि.१० : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या २०२४ वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटला शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल ‘एज्युकेशन वर्ल्ड’ संस्थेमार्फत “इलेस्ट इमर्जिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट” (उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था)२०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी हा पुरस्कार मा. श्री. सौरभ अग्रवाल, सचिव, राजस्थान सरकार यांच्या हस्ते स्वीकारला आहे.या प्रसंगी बोलताना संचालक, डॉ. गिरी म्हणाले, “विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा मनाचा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकांचे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित सर्व स्टाप, जागतिक दर्जाचे शिक्षण  या सर्व गोष्टींमुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो.”
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विद्यापीठाचे विश्वस्त,  विनायक भोसले, यांनी इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. गिरी व त्यांच्या टीमच्या  शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल  मनःपूर्वक अभिनंदन केले. शिक्षकवर्ग, विद्यार्थी, आणि पालकांचेही त्यांनी आभार मानून शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×