डिकेटीई च्या सहा विद्यार्थ्यांची टेकमहिंद्रा कंपनीत निवड
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १८ मेः येथील डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची टेकमहिंद्रा या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्हुवद्वारे निवड झाली आहे. टेकमहिंद्रा ही एक स्फॉटवेअर व माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आग्रेसर कंपनी आहे. भारतामध्ये पुणे येथे या कंपनीचे मुख्यालय आहे.या कॅम्पस इंटरव्हयू मधून डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, व इटीसी, इंजिनिअरींग विभागातील एकूण सहा विद्यार्थ्याना टेकमहिंद्रा या इंडस्ट्रीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळाली संघमित्रा गायकवाड, यथीन शेट्टी, प्रणव होगाडे, स्लेशा पाटील, आकाश जाधव व प्रतिक्षा महिंद हे निवड झालेले विद्यार्थी आहेत
डिकेटीईमध्ये प्लेसमेंट निवडीसाठी विविध नामांकित तज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानांच विविध नामांकित कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यामध्ये डीकेटीई ही संस्था नेहमीच आघडीवर आहे. या प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनिअरींग विभागाचे टीपीओ प्रा.जी.एस. जोशी यांनी विशेष परीश्रम घेतले. सदर विद्यार्थ्यास डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, डे.डायरेक्टर प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, सर्व विभागप्रमुख व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.