Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.११ :इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणात साठलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांमार्फत काढून घेऊन जाणेसाठी मान्यता देणेबाबतचा निर्णय कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या मागणीवरून सदरची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली.सदर निर्णयामुळे पंचगंगा नदी मोकळा श्वास घेणार तर आहेच शिवाय महपूर नियंत्रणासाठी या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार असल्याचे मत आमदार डॉ राहुल आवाडे यांनी व्यक्त केले.
३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षतेखाली सदर विषयाच्या अनुषंगाने आमदार राहूल आवाडे आणि अमंलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक इतर सर्व विभाग जसे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर, उपविभागीय अधिकारी,इचलकरंजी, आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी, इत्यादींसोबत सविस्तर बैठक घेण्यात आली होती. पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या दिनांक २५ जुलै २०२३ व दिनांक- १५ ऑक्टोबर २०२४ मध्ये नमूद असलेल्या नदीपात्रामधील ठिकाणीच गाळ काढता येणे शक्य असल्याने व उर्वरीत ठिकाणी प्रथम लाल व निळ्या पूर रेषांचे सर्वेक्षण करुन मुख्य अभियंत्यांच्या मान्यतेनंतर अशा ठिकाणी गाळ काढता येईल, अशी चर्चा झाली होती.सदर गाळ साठलेल्या नदीपात्राच्या ठिकाणी जलसंपदा विभाग, इचलकरंजी महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या समितीने स्थळ पहणी करावी व अहवाल इकडे सादर करावा असे सदर बैठकीत ठरविण्यात आले होते. त्यानुसार ०४ जानेवारी रोजी सर्व समिती सदस्यांनी इचलकरंजी शहरालगतच्या पंचगंगा नदीपात्रास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व इचलकरंजी शहराच्या पूरव्यवस्थापनाच्या दृष्टीने नदीपात्रातील वाळू मिश्रीत गाळ काढणे अत्यावश्यक असल्याचा अहवाल दिनांक- ०७ जानेवारी रोजीच्या कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग, कोल्हापूर यांच्या स्वाक्षरीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यानंतर मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उपस्थित सदस्यांना या विषयाच्या अनुषंगाने त्यांचे मत व्यक्त करण्यास सांगितले. यानंतर उपस्थित प्राधिकरणाच्या सदस्यांनी नमूद केले की, सदर बाब ही अत्यंत आवश्यक असल्यामुळे इचलकरंजी शहराचा पंचगंगा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीचे पात्र उथळ झालेले आहे, आणि त्यामुळे पावसाळा कालावधीमध्ये नदीपात्र दुभडी भरुन वाहते, इचलकरंजी शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होते. सन २००५,२००६, २०१९,२०२१ या वर्षामध्ये पंचगंगा नदीत पूर आल्यामुळे शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन लोक बाधीत झाले होते. जर नदीपात्रात साठलेला गाळ काढण्याचे काम हाती घेतले तर नदी पात्रातील खोली वाढणार आहे. परिणामी पूरस्थिती नियंत्रणात येणार आहे. तसेच नदीमध्ये पाणी सामावून घेण्याची क्षमता वाढणार आहे. यास्तव हा प्रकल्प त्वरीत राबवणे आवश्यक आहे, असे नमूद केले.
सदर बाब ही कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा नदीच्या पूर व्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक असल्यामुळे पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम त्वरीत हाती घ्यावे. जेणेकरुन येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी नदीपात्राची खोली व रुंदी वाढण्यास मदत होईल, असे सर्व सदस्यांनी मत व्यक्त केले.
सदर बैठकीस संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी हर्षजीत घाटगे, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर महानगरपालिका, अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, प्रविण खानापुरे, पोलिस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, सुशांत रेवडेकर, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद श्रीमती सरिता थोरात, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, रोहित तोंदले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संदिप दावणे, उपकार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, ओमप्रकाश दिवटे, आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका, प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय आदींसह इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.