बँकेच्या आर्थिक समतोलाला गती, डिजिटल सेवा लवकरच ग्राहकांच्या सेवेत :चेअरमन सुनिल पाटील
बँकेच्या आर्थिक समतोलाला बळ, तांत्रिक प्रगतीची नविन वाट – ग्राहकांसाठी Net Banking, Mobile Banking, UPI सेवा लवकरच उपलब्ध होणार
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .५ : इचलकरंजी येथील संमती सहकारी बँकेने आपल्या ताळेबंदाचे काटेकोर नियोजन करत ठेवीवरील आणि कर्जावरील व्याजदर योग्य प्रकारे ठरवले आहेत. त्यामुळे बँकेचा आर्थिक समतोल अधिक बळकट झाला असून, खातेदारांचा विश्वास कायम राखण्यात बँक यशस्वी ठरली आहे. आर्थिक पारदर्शकता आणि जबाबदारीची भूमिका निभावत बँकेने एक आदर्श उभा केला आहे. अशी माहिती चेअरमन सुनील पाटील यांनी पत्रकार परिषेदेत दिली .
तंत्रज्ञानातील मोठी झेप – Net Banking, Mobile Banking, IMPS आणि UPI सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा
बँकेने आता डिजिटल युगात महत्त्वाचे पाऊल टाकले असून, DC/DR Cloud (Data Center / Disaster Recovery) प्रणालीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांवर होणाऱ्या खर्चासाठी आरबीआयकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. विशेष म्हणजे, आजच आरबीआयकडून या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे.
ही मान्यता मिळताच, बँक लवकरच ग्राहकांसाठी Net Banking, Mobile Banking, IMPS व UPI सेवा सुरू करणार आहे. या सुविधा सुरू झाल्यानंतर बँक ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी अत्याधुनिक, सुरक्षित आणि जलद सेवा मिळणार आहेत. तसेच, मोठ्या ग्राहकवर्गासाठी मर्चंट सेवा सुरू करण्याचाही बँकेचा मानस असून, त्याद्वारे व्यापारी वर्गासाठी अधिक सुलभ सेवा उपलब्ध होतील.
नेतृत्व, मार्गदर्शन व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून मिळालेलं यश
या यशस्वी वाटचालीसाठी बँकेच्या सर्व संचालक मंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्हीओएम चेअरमन डॉ. आप्पासाहेब होसकल्ले, वित्त तज्ञ संचालक सीए सुनिल रेवणकर यांचे वर्षभर लाभलेले मार्गदर्शन आणि सर्व कर्मचाऱ्यांचा सातत्यपूर्ण परिश्रम यामुळेच बँकेने ग्राहकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बँक एक विश्वासार्ह, प्रगतीशील आणि जनसामान्यांच्या हितासाठी काम करणारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. सदर पत्रकार परिषदेमध्ये व्हा. चेअरमन एम. के. कांबळे, बीओएम चेअरमन डॉ. आप्पासाहेब होसकल्ले, तसेच संचालक शितल पाटील, प्रा. डॉ. प्रद्युमकुमार कडोले, डॉ. पुरुषोत्तम कुलकर्णी, विठ्ठल चोपडे, अण्णासो मुरचिटे, चंद्रकांत पाटील, प्रदीप मणेरे, संजय चौगुले, प्रा. आप्पासाहेब पाटील, गिरीश देशपांडे, संजय कुडचे, संदीप माळी, सौ. वसुंधरा कुडचे, डॉ. सौ. निमा जाधव, मनिष पोरवाल (सीए), महावीर वेळरूटे, तसेच सीईओ अशोक पाटील, असि. सीईओ समीर मैंदर्गी आणि बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार उपस्थित होते.बँकेची ही वाटचाल नव्या युगाच्या दिशेने असून, पारंपरिक मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्याचा निर्धार बँकेने केला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.