इंदिरा गृहनिर्माण संस्थेची  ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीत पार

कबनूर : हबिब शेख दर्जी 
दि .२४ :येथील  इंदिरा गृहनिर्माण संस्थेची  ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळी च्या  वातावरणात पार पडली . संस्थेच्या सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे कामकाज सुरू आहे. सभासदांच्या मान्यतेने अहवाल सालात संस्थेच्या मंगल कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी लग्न व इतर कार्यक्रमासाठी एक नवे व सुसज्ज असे दालन सुरु झाले आहे असे प्रतिपादन इंदिरा गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन दिलीप झोळ हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

उपाध्यक्ष अशोक वसगडे यांनी स्वागत केले. यानंतर संचालक बाळासो ऐनापुरे यानी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. सचिव शिवय्या जंगम यांनी नोटीस वाचन व इतिवृत्त वाचन केले. प्रास्ताविकात चेअरमन दिलीप झोळ यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानु-मते मंजूर झाले. अहवाल सालात नफा कमी झाल्याने यावेळी भेटवस्तू न देणेबाबत सभा-सदांनी उत्स्फूर्तपणे सांगितले. हा विषय सभासद रविकांत भंडारे यांनी मांडला त्यास बसगोंडा पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर जेष्ठ नेते सुधाकरराव मणेरे, माजी चेअरमन पांडुरंग राजमाने, मारुती वाशीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संचालक अनिल कुलकर्णी, महंमद युनुस खतीब, सुरेंद्र मगदूम, रामचंद्र भोसले, दत्तात्रय भिलवडीकर, सुरेश कुंभार, नजीर सर्जेखान, रवींद्र सावंत, सुधाकर ताडे, विजय देसाई, सौ. विजयमाला जाधव, सौ. सुनिता शिंगाडे, राजाराम पवार, प्रमोद गोळंबे आदि उपस्थित होते. संचालक विशाल दास यांनी सुत्रसंचलन केले. संचालक विक्रांत दानोळीकर यानी आभार मानले.