शरद कृषि हळद पिक तंत्रज्ञान परिसंवाद संपन्न

जैनापूर,: राम आवळे 

दि ..२२  : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्याल, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकार अंतर्गत मसाले बोर्ड, मुंबई व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी हळद पिक तंत्रज्ञान संपन्न झाले. उदघाटन शासकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ . विश्वनाथ शिंदे व संस्थेचे एक्झि क्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. या वेळी डॉ . शिंदे यांनी शेती तंत्रज्ञान व दुष्दुकाळ परिस्थित शेतीची घ्या वयाची काळजी आणि शेती उत्पादना साठी उपलब्ध असलेल्या एक्सपोर्ट बाजारपेठ या बद्दल शेतकऱ्यां ना मा र्गदर्शन केले.
मार्गदर्शक डॉ . मनो ज माळी यांनी शेतकऱ्यांना हळद लागवड करणे पासून हळद उत्पादन घेत असताना हळदी मध्ये आंतरपिके कोणती घ्यावीत. खत मात्रा , त्याचे प्रमाण व पद्धती याची सविस्तर माहिती
दिली . पाण्याचे नियोजन कसे असावे, रोगापासून पिकांची मुक्तता , हळद उद्योग, व बाजारपेठेतील हळदी चे महत्व या बद्दल मा र्गदर्शन केले आहे.हे डॉ . ममता धनकुटे यांनी हळदी चे व इतर मसाला यांची गुणवत्ता वा ढवणे त्याचबरोबर हळद आणि मसाला यांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट मधील नफा आणि त्या संदर्भातील कंपन्या यांचे मार्गदर्शन केले.
शासकीय योजनांची माहिती दिली . प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुशांत पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा . पूजा भो सले यांनी केले. आभार डॉ . श्री निवास बन्ने यांनी मानले. या कार्यक्रमा साठी सर्व शिक्षक – शि क्षकेत्तर कर्मचारी ,शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.