शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : मालोजीराजे छत्रपती यांचे आवाहन

कोल्हापूर :प्रवीण भोसले 

दि.२०: शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार जयंत आसगावकर यांना विजयी करा, गेली सहा वर्षे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते पुढे असतात. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा त्यांनी जपला आहे , त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केले. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.आमदार जयंत आसगावकर, महानगरपालिकेतील गटनेते व काँग्रेसचे नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण, माजी प्राचार्य डॉ. व्ही.एम.पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या मेळाव्यास मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळाले.


प्रा. जयंत असगावकर म्हणाले, शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. आमदारकीचा सर्व निधी शिक्षण संस्थां, शाळांमध्ये खर्च केला आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न आजही आहेत . या प्रश्नांचे सोडवणुकीसाठी काँग्रेससह महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिली आहे. सर्वांनी एक नंबर पसंतीचे मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डीडी आसगावकर व श्रीपतराव बोंद्रे दादा यांचा मोठा स्नेह असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी प्रा. असगावकर यांच्या आमदार फंडातून विविध वस्तू महाविद्यालयाला मिळाल्याचे सांगितले. पुरोगामी विचारालाच निवडून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
स्वागत प्रा. पि.के.पाटील यांनी केले आभार डॉ. के. एम. देसाई यांनी मानले .मुख्याध्यापक युवराज पवार, श्री विठ्ठल आबंले,प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले,सर्व शिक्षक, प्राध्यापक,प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते.