बेपत्ता व्यक्तीबाबत निवेदन

रत्नागिरी, दि.10:

छबी रामचंद्र पांचाळ या १२ जून २००३ पासून  औदुंबर चौक, कोकणनगर ता. जि. रत्नागिरी  येथून बेपत्ता आहेत.  या बेपत्ता व्यक्तीचे वय-३५ वर्षे, उंची ४ फूट ५ इंच, रंग निमगोरा, बांधा मध्यम अंगात लाल रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाऊज, गळ्यात चांदीची चैन व त्या मनोरुग्ण आहेत.    या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास  रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा. 

[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..

नियाझ खान —9921435330..

दिपक तुळसणकर —9730389876)..

नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].

तुषार विलास चव्हाण हे निरीक्षण गृह रत्नागिरी पाटबंधारे वसाहत आर/५/११ कुवारबाव  ता. जि. रत्नागिरी येथे राहणारा १ जुलै २०१४ पासून  देसाई हायस्कूल रत्नागिरी येथून बेपत्ता आहेत.  या बेपत्ता व्यक्तीचे वय- १७ वर्षे, उंची १५४ सेमी, रंग गोरा, केस काळे साधारण वाढलेले, बांधा मध्यम, छातीवर उजव्या बाजूला तीळ व अंगात देसाई हायस्कूलचा युनिफॉर्म आहे.    या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास  रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
मयुर अनंत कदम व स्वप्नील संजय गायकवाड हे १ सप्टेंबर २०१२ पासून निरीक्षण गृह बालसुधार गृह रत्नागिरी येथून  बेपत्ता आहेत.  मयुर अनंत कदम या बेपत्ता व्यक्तीचे रंग सावळा, केस काळे, बांधा ठेंगू व मजबूत व उजव्या गालावर तीळ आहे.  अंगात चौकटीचा शर्ट व नेसणीस हिरव्या रंगाची पँट आहे.    स्वप्नील संजय गायकवाड याची उंची ६ फूट रंग काळा केस काळे उजव्या करंगळीवर तीळ, बांधा मजबूत असा आहे.  या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास  रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.