बायोमायनिंग फेज-१ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि. १३ : बायोमायनिंग फेज-१ अंतर्गत काही कामे अद्याप प्रलंबित असल्याने परिसरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत नगरसेवक अमरजीत जाधव व नगरसेवक नंदकुमार पाटील यांनी गुरुवारी महापौरांकडे निवेदन सादर केले. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांचा त्रास दूर करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

            यावेळी महापौरांनी नगरसेवक अमरजीत जाधव व नंदकुमार पाटील यांच्याकडून बायोमायनिंग फेज-१मधील प्रलंबित कामांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही महापौरांनी दिली.

           नगरसेवक अमरजीत जाधव व नगरसेवक नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, बायोमायनिंग फेज-२ अंतर्गत आतापर्यंत झालेली कामे चांगल्या पद्धतीने झाली आहेत. मात्र, फेज-१मधील काही कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

       त्यामुळे प्रलंबित कामांमध्ये कोणताही विलंब न करता ती तातडीने पूर्ण करावीत आणि नागरिकांना होत असलेला त्रास दूर करावा, अशी मागणी दोन्ही नगरसेवकांनी महापौरांकडे केली.