इचलकरंजी: विजय मकोटे
दि.११ जानेवारी २०२५ :येथील संग्राम बालवाडी व अरुण विद्या मंदिर शाळेतील इयत्ता पहिलीतील महिला पालक व बालक यांची शैक्षणिक सहल कनेरी मठ या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाली. शहरात प्रथमच पालकांचा आणि बालकांना एकत्रित सहलीचा शैक्षणिक अनुभव देण्यात आला. यावेळी महिला पालकांना आपल्या मुलासोबत सहल अनुभवताना खूप आनंद होता, तर मुलांना आपली आई सोबत असल्यामुळे त्यांच्यामध्ये ही नवचैतन्य होते.
भारतीय संस्कृतीची ओळख, विविध खेळ, गार्डन भेट, एकत्र स्नेह भोजन, मंदिर भेट, असे विविध अनुभव- अनुभूती पालकांनी व मुलांनी अनुभवले. सदर उपक्रमाची शहरातील शाळेत विशेष चर्चा होती. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अशोकराव स्वामी यांची प्रेरणा, माजी नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांचे मार्गदर्शन, तर सेक्रेटरी संग्राम स्वामी यांचे वतीने सर्व मुलांना व पालकांना खाऊ वाटप देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक.श्री. संजय कोळी सर्व शिक्षक उपस्थित होते…