रत्नागिरी : सिद्धेश मराठे
राजापुर नगरपरिषदेती भाजपाचे विद्यमान नगरसेवक गोविंद चव्हाण व त्याचे सहकारी यांनी आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताच, आमदार राजन साळवी कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शुक्रवारी शिवसेना भवन राजापुर येथे आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे नगरसेवक गोविंद चव्हाण व त्याचे सहकारी यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार डॉ.राजन साळवी यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. त्यावेळी विद्यमान नगरसेवक गोविंद चव्हाण यांचे समवेत निनाद शिर्सेकर बुथप्रमुख, नेहा चव्हाण बचतगट अध्यक्ष, संपदा वाघरे, जयश्री म्हादये खजिनदार बचतगट, स्मिता चिबुलकर, वैशाली पावसकर, मृण्मयी चव्हाण, संजय मोहिते, साईराज चव्हाण, चैतन्य शेट्ये ,तन्मय शिवलकर, समीर नावेलकर आदि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
आमदार डॉ.राजन साळवीन्च्या प्रमुख उपस्थिती पार पडलेल्या ह्या शिवसेना प्रवेशाप्रसंगी तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, संतोष हातणकर, पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, प्रशांत गावकर, उपविभाग प्रमुख नंदू मिरगुले, शहर संघटक जितेंद्र मालपेकर, महिला शहर आघाडी वीणा विचारे, युवासेना शहर अधिकारी प्रज्योत खडपे, नगरपरिषद गटनेता विनय गुरव, उपशहर प्रमुख प्रभाकर गुरव, नगरसेवक अनिल कुडाळी, सौरभ खडपे, नगरसेविका शुभांगी सोलगावकर, विभाग प्रमुख संगीता चव्हाण, माजी नगरसेवक अभय मेळेकर, धनश्री मांजरेकर, उपविभाग प्रमुख दिलीप चव्हाण, बबलू चव्हाण, कार्यालय प्रमुख मधू बाणे, प्रदीप आंबवले, विलास हरयाण, शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.