हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त घाेषित *आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा *शेतकèयांना मिळणार 12 सवलतींचा लाभ

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी
दि.२१:पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे दुष्काळी संकटात सापडलेल्या हातकणंगले तालुक्यातील बळीराजाला अखेर माेठा दिलासा मिळाला आहे. आमदार राहुल आवाडे यांनी शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घाेषित केला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध बारा महत्त्वपूर्ण उपाययाेजना आणि सवलतींचा थेट लाभ मिळणार आहे.
सन 2026 च्या खरीप हंगामातील ट्रिगर 1 व ट्रिगर 2 च्या निकषांनुसार राज्यातील 305तालुक्यांमध्ये दुष्काळ घाेषित करण्यात आला आहे. परंतु, दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तांत्रिक अटींमुळे हातकणंगले तालुक्याचा या यादीमध्ये समावेश झालेला नाही. या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश हाेण्यासाठी पाठपुरावा सुरु केला हाेता. त्यानुसार शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागार्माफत दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले हाेते.
तालुक्यातील गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी हातकणंगले  तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकèयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य शासन आणि महसूल विभागाकडे जाेरदार पाठपुरावा केला हाेता. त्यांच्या या मागणीची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकèयांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माी यांसह एकूण 12 प्रकारच्या शासकीय सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. ऐन संकटाच्या काळात शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.