शरद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी निवड

जैनापूर,:सलीम माणगावे

दि. २१ :जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयामधील विद्यार्थिनी कु. राजेल पटेल हिची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे नुकताच इंद्रधनुष्य २०२६ च्या निवड चाचणीत निवड झाली. तिची इन्स्टॉलेशन विभाग-पोस्टर, स्थळ छायाचित्र प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. तिची २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०२६ या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे होणा-या स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच लोकसंगीत वाद्यवृद या प्रकारात श्रेयश कुंभार याची निवड झाली आहे. लोकनृत्य या प्रकारांमध्ये कु. तेजस्विनी मस्कर तिची निवड झाली आहे.

विद्यार्थीची निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, राहुरी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी विलास आवारे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुशांत पाटील, संघ व्यवस्थापक प्राध्यापक दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.