डीकेटीई मध्ये सहकारमहर्षी स्व. दत्ताजीराव कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि  १९ : कोल्हापूर जिल्हयाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. दत्ताजीराव कदम यांचे स्मृतिदिनानिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टी एस.डी.पाटील, ए.टी. कुडचे, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्यासह संचालिका प्रा डॉ एल एस आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.