इचलकरंजीत सौ. सुषमा साळुंखे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साधेपणाने साजरा –

सुरेल गीते आणि स्नेहभोजनाने वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले!

इचलकरंजी –विजय मकोटे 

दि .२५ : येथील नामांकित सिव्हिल इंजिनियर श्री. अरुण साळुंखे यांच्या पत्नी, गारमेंट उद्योग क्षेत्रातील उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमा अरुण साळुंखे यांचा वाढदिवस यंदा एका वेगळ्याच आणि मनाला स्पर्श करणाऱ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.सौ. साळुंखे यांनी आपला वाढदिवस इचलकरंजी येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला. कोणताही गाजावाजा न करता, पूर्ण साधेपणात आणि आत्मिक आनंदात झालेल्या या कार्यक्रमात वृद्धांसाठी विशेष स्नेहभोजन आणि कराओके संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सूरदास कराओके स्टुडिओच्या कलाकारांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कालातीत गीते सादर करत वृद्धांच्या मनाचा ठाव घेतला. गाण्यांच्या सूरांनी आणि प्रेमळ वातावरणाने वृद्धाश्रमात क्षणभर का होईना पण आनंदाचे सूर उमटले. स्नेहभोजनात सर्व वृद्धांनी आनंदाने सहभागी होत सौ. सुषमा साळुंखे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

या वेळी महालक्ष्मी टाईम्सचे समूह संस्थापक व संपादक फिरोज शेख, सूरदास सिंगिंग स्टुडिओचे अरुण साळुंखे ,रिटा रोड्रिक्स हरेकृष्ण अडकिल्ला,ताहीर शेख सौ व श्री डाके,उज्वला केर्ले, श्री धनंजय, पळसुळे, सूरदास गायक ग्रुप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत सौ. सुषमा साळुंखे यांनी दिलेल्या या आनंदाच्या क्षणांची चर्चा सध्या इचलकरंजीत सर्वत्र होत आहे. त्यांच्या या उपक्रमातून समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

#BIRTHDAY#ARUDHASRAM#