इचलकरंजी –अन्वर मुल्ला
दि.१३: राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्र विकास याेजनेअंतर्गत अतिशय क्षेत्र बाहुबली व श्री क्षेत्र कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची आमदार राहुल आवाडे आणि जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड यांनी पाहणी केली.आळते येथे पुढील वर्षी माेठ्या प्रमाणात पंचकल्याण महामहाेत्सवाचे आयाेजन केले आहे. तर श्री क्षेत्र बाहुबली येथे दर १२ वर्षांनी भगवान बाहुबली यांचा महामस्तकाभिषेक हाेत असताे. याठिकाणीही पंचकल्याण महामहाेत्सवाचे आयाेजन केले आहे. त्यानिमित्ताने लाखाे भाविकांची उपस्थिती असणार आहे. त्या अनुषंगाने या तीर्थक्षेत्रांमध्ये अंतर्गत रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुशाेभीकरण, वाहनतळ तसेच भाविकांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्याकडून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आले असून त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकाèयांसाेबत स्थळ पाहणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड, प्रांताधिकारी दीपक शिंदे यांचेसमवेत बाबासाे चाैगुले, डी. सी. पाटील, बाबासाहेब पाटील, तात्या अथणे, गाेमटेश बेडगे, अनिकेत चाैगुले, सचिन पाटील, सुधीर पाटील, धनंजय टारे, आळते सरपंच अजित इंगवले, शितल हावळे आदींनी दाेन्ही तीर्थ क्षेत्रांना भेटी देऊन तीर्थक्षेत्र याेजना अंतर्गत करावयाच्या विविध विकासकामांची पाहणी केली. भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डाॅ. राठाेड यांनी आमदार आवाडे यांच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.