कडवई -मुजीब खान
संगमेश्वर येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते कॅप्टन हनिफ खलपे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनचा कार्यक्रम शास्त्री पुल, कसबा येथे आमदार शेखर जी निकम , माजी सेना जिल्हा प्रमुख राजनजी ( आण्णा ) महाडिक , जेष्ठ रत्नागिरी जिल्हा काँग्रेस नेते आणि शेतकरी कष्टकरी संघटनेचे महा . राज्य अध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या उपस्थित पार पडला या वेळी कसबा , फणसवणे , कळंबस्ते , अंत्रवली , कारभाटले , नायरी , शृंगारपुर , कातुर्डी , हेदली , आंबेड , नावडी या गावातील मान्यवर उपस्थित होते.
कॅप्टन हनिफ खलफे यांच्या कार्यालयाचे आमदार शेखर निकम यांनी फित कापून व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या तर राजेंद्र महाडिक यांनी श्रीफळ फोडून उद्घाटन केले काँगेसचे जेष्ठ नेते अशोकराव जाधव यांनी कॅप्टन हनिफ खलफे यांचा शाल , श्रीफळ, पुष्प गुच्छ देवून त्यांचा सत्कार केला . या प्रसंगी सरपंच मॅडम , इलियास मापारी , अकबर दसुरकर ,रफीक नेवरेकर, मजीद नेवरेकर, फिरोज भाई रफिक सावंत , नजीर म्हाते , रफीक म्हाते, जियारत , अशरफ शेखदारे , नियाज कापडी , ईमतियाज कापडी ,घाणेकर , नवनाथ शेटये इत्यादी मान्यवर शुभेच्छा देणे साठी उपस्थित होते .