कडवई बाजारपेठेत तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कडवई:नियाझ खान 

दि  १३  : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कडवई बाजारपेठेत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाईशा घोसाळकर हायस्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या पुढाकाराने आयोजित या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

रॅलीची सुरुवात भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवई येथून झाली. बाजारपेठ मार्गे ग्रामपंचायत कार्यालय येथे तिचा समारोप झाला. रॅलीच्या पुढील बाजूस सजविलेल्या गाडीवर देशभक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठ देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमली.

कडवई इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रांजल मोहिते यांनी रॅलीतील सहभागींचे मार्गदर्शन केले. या वेळी कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओकटे, कडवई पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सदानंद ब्रीद, भाईशा घोसाळकर हायस्कूलचे पर्यवेक्षक संतोष साळुंखे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोथरे, श्री. वरदान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भैय्या प्रसादे, सादिक खान, दीपक कांबळे, बावा कांबळे, अनंत नांदलस्कर, दत्ताराम सुर्वे, अंकुश सुर्वे, गुरुनाथ ओकटे, अक्षय मोहिते, अनिकेत मोहिते, उत्तेश धामनाक, विशाल कडवईकर, प्रदीप कांबळे, प्रथमेश कडवईकर, चैतन्य रेडीज, अनिल तावडे, विनोद पवार, अनिल किंजळकर, वैष्णवी रेडीज, कश्मिरा कांबळे, सुप्रिया कांबळे, विलास मेस्त्री, रोशन पाष्टे, रोशन सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, डॉ. अमित ताठरे, प्रशांत रानडे, स्वप्नील सुर्वे, मारुती होडे, समीर पाटणकर, उर्मिला कातकर, विठ्ठल सुर्वे, शिऱ्या घोसाळकर, रोहित घोसाळकर, निहाल खान यांच्यासह दोन्ही शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या तिरंगा यात्रेमुळे परिसरात देशभक्तीचा उत्साह आणि एकतेचा संदेश दृढ झाला.