इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १२ : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवारी तिरंगा बाईक आणि सायकल रॅली तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने निघालेल्या या रॅलीला आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रॅलीची सुरुवात महापालिका मुख्य कार्यालयातून झाली. शिवतीर्थ, महात्मा गांधी पुतळा, लोकमान्य टिळक पुतळा, रसना कॉर्नर मार्गे श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे रॅलीचा समारोप झाला.
यानंतर नाट्यगृहात ॲड. बाबासाहेब निकम संचलित हरी ओम संगीत मंचच्या हौशी कलाकारांनी देशभक्ती जागवणाऱ्या गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. या रॅलीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहायक आयुक्त विजय राजापुरे, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, मुख्याध्यापक शंकर पोवार, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, शाखा अभियंता डॉ. बाजीराव कांबळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, महिला व बालविकास अधिकारी बेबी नदाफ, भांडार अधीक्षक सुजाता दाभोळे, धनंजय पळसुले, विजय पाटील, मंगेश दुरुगकर, महादेव मिसाळ यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी-कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक आणि सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले.
गीत कार्यक्रमात हरी ओम संगीत मंचचे समीर चौगुले, प्रताप जाधव, भुषण भिवरे, निलेश लोखंडे, रफिक नदाफ, विजय यादव, अमृता पोवार व शुभांगी कुलकर्णी यांनी देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या उपक्रमामुळे शहरात देशभक्तीचा उत्साह आणि एकतेचा संदेश घुमला.