महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला शहरवासियांचा उस्फूर्त प्रतिसाद

पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला सहकार्य केले बद्दल शहरवासीयांचे मनःपूर्वक आभार :- आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

इचलकरंजी: हबीब  शेख दर्जी 

दि .३ : माझी वसुंधरा तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनास अनुसरून इचलकरंजी शहरामध्ये  मंगळवार दि. ०२ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या घरगूती गणेश मूर्ती विसर्जना साठी महानगर पालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करणेसाठी शहापुर खण, तसेच शहरांमध्ये जवळपास ५२ ठिकाणी सुंदर रित्या फुलांची सजावट केलेले कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन कुंड आणि निर्मांल्य कुंडाची व्यवस्था करणेत आलेली होती. त्याचबरोबर पंचगंगा नदी घाट परिसरात सुद्धा गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करणेत आलेला होता. महानगरपालिकेच्या वतीने ठेवणेत आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या सुविधेस इचलकरंजी शहरवासीयांनी उस्फुर्त पणे प्रतिसाद दिला.
          महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेसह अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम यांनी आज शहरातील विविध ठिकाणच्या कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाना भेट देऊन पाहणी केली. तसेच गणेश विसर्जन सोहळ्यात उस्फुर्त पणे सहभागी होवुन गणेश भक्तांना शुभेछा दिल्या.


यावेळी सर्वच ठिकाणी उपस्थित असलेल्या गणेश भक्तांनी गणेश विसर्जनासाठी महानगर पालिकेच्या वतीने केलेल्या शहापूर खण तसेच शहरातील विविध ठिकाणी तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.
आज दिवसभरात इचलकरंजी शहरवासीयांच्या कडून जवळपास ११३५५ गणेश मूर्तींचे विसर्जन महानगरपालिके कडून निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडासह पंचगंगा नदी घाट परिसरातील कृत्रिम तलावात आणि शहापूर खण येथे करण्यात आले त्याचबरोबर जवळपास १५ टन निर्माल्य जमा करून महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरण पुर्वक गणेशोत्सव साजरा करणेसाठी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.

आजच्या या घरगुती गणेश विसर्जन सोहळ्या करिता महानगरपालिके कडुन १ क्रेन, २ यांत्रिक बोटी,१ अग्निशमन वाहन, २ रुग्ण वाहिका , २१ आयशर टेंपो, ५ ट्रॅक्टर यासह महानगरपालिकेचे सहा आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, शाखा अभियंता बाजी कांबळे, घनकचरा विभाग प्रमुख सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सहा.आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी, महादेव मिसाळ, विजय पाटील, डॉ नितिन भाट, स्वच्छता निरीक्षक सुरज माळगे, संदीप मधाळे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांचेसह सर्व विभाग प्रमुख , अधिकारी कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक , वॉर्ड इन्स्पेक्टर यांचेसह जवळपास ६०० अधिकारी- कर्मचारी ,१५० स्वयंसेवक तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आणि एन.यु.एच.एम. विभागाकडील वैद्यकीय पथक संपूर्ण दिवस कार्यरत होते. त्याचबरोबर प्रत्येक कामात नेहमी सहकार्य करणाऱ्या शहरातील पोलिस बॉईज असोसिएशन, आधार फौंडेशन इचलकरंजी, वीर रेस्क्यु फोर्स इचलकरंजी यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच महानगरपालिकेच्या या सर्व यंत्रणेवर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेसह, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम पुर्णवेळ लक्ष ठेवून होते.
महानगरपालिकेकडून करणेत आलेल्या पर्यावरणपुर्वक गणेशोत्सवाच्या या आवाहनाला उस्फुर्तपणे प्रतिसाद देवुन सहकार्य केल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शहर वासीयांचे आभार व्यक्त केले आहे.