इचलकरंजी – हबीब शेखदर्जी
दि. 11 : येथील श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी या बँकेमध्ये जैन धर्मातील २४ वे तिर्थंकर भगवान महावीरांना निर्वाणप्राप्ती झाल्याने दरवर्षीप्रमाणे पूजन संपन्न झाले. सदर पूजन बँकेचे व्हा. चेअरमन श्री. मधुकर मणेरे सपत्निक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.मंगळवार दिनांक १०/११/२०२६ रोजीच्या या मंगलमय पाडव्याच्या निमित्ताने बँकेने राबविलेल्या विशेष ठेव संकलन मोहिमेला सभासद, ठेवीदार व ग्राहकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांच्या नियोजनबध्द प्रयत्नांमुळे बँकेच्या एकूण २०० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करून २०१ कोटी ८५ लाख इतकी ठेव झालेली आहे.
ही कामगिरी म्हणजे केवळ आर्थिक उद्दिष्टपूर्ती नसून बँकेवर सभासद व ठेवीदारांनी दाखविलेल्या अढळ विश्वासाची पावती आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक तसेच सर्व संचालक व अधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले आहे.यापुढेही आधुनिक बँकींग सेवा व सुरक्षा, ग्राहकाभिमुख कार्यपध्दती, पारदर्शक व्यवहार व आर्थिक शिस्त यांच्या माध्यमातून बँकेची उत्तरोत्तर प्रगती साधण्याचा संकल्प चेअरमन श्री. चंद्रकांत मगदूम यांचेकडून व्यक्त करणेत आला. तसेच दिपावली पर्वाच्या निमित्याने आपल्या सर्वांचे जीवन आनंद, समृध्द आणि उत्तम आरोग्याने उजळून निघो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी बँकेचे संचालक बाळासाहेब चौगुले, सुभाष काडाप्पा, अभयकुमार उर्फ राजू मगदूम, श्रेणिक मगदूम, सुदर्शन खोत, अनिल बम्मन्नावर, संपत कांबळे, गुरुनाथ हेरवाडे, सुकुमार पोते, सुचित हेरवाडे,संचालिका मंगल देवमोरे व अनिता चौगुले तसेच बँकेचे सीईओ जयकुमार उपाध्ये, सीएओ जिवंधर चौगुले, असि. सीईओ निलेश बागणे व संतोष रायनाडे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.