आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

हातकणंगले तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती पार्श्वभूमीवर पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश

इचलकरंजी: विजय मकोटे 
दि.२९ : महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागार्माफत दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रश्नी आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून नुकसानीचे वास्तव समाेर येऊन तालुक्यातील शेतकèयांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग माेकळा हाेणार आहे
सन २०२६  च्या खरीप हंगामातील ट्रिगर १  व ट्रिगर २  च्या निकषांनुसार राज्यातील ३०५  तालुक्यांमध्ये दुष्काळ घाेषित करण्यात आला आहे. परंतु, दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तांत्रिक अटींमुळे हातकणंगले तालुक्याचा या यादीमध्ये समावेश झालेला नाही. या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश हाेण्यासाठी पाठपुरावा सुरु केला हाेता.
२७ ऑगस्ट ते २  नाेव्हेंबर २०२६  या कालावधीत ७  दिवसाचा खंड व ३ सप्टेंबर राेजी ७.२  मी. मी. पाऊस नाेंदवला गेल्यामुळे ४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत सलग १६  दिवस खंड पडला आहे. तालुक्यातील खरीप हंगामात अत्यंत गंभीर व आपत्तीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. २७ ऑगस्ट ते ते २  नाेव्हेंबर या महत्त्वाच्या कालावधीत केवळ ३ सप्टेंबर राेजी ७.२  मि.मी. पाऊस नाेंदवला गेला. केवळ या एका दिवसाच्या नाेंदीमुळे सलग २१  दिवस पावसाचा खंड ही तांत्रिक अट पूर्ण न झाल्याने तालुका ट्रिगर १ व २ मधून वगळला गेला. २४ दिवसाच्या कालावधीमध्ये ७.२ मि.मी.पडलेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी पुरेसा असू शकत नाही. याचा प्रत्येक पिकाच्या उत्पादनामध्ये घट हाेण्याची शक्यता आहे. साेयाबीन, भुईमूग व भात या प्रमुख खरीप पिकांच्या ुलाेरा व शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात पाऊस नसल्याने तालुक्यातील ४० ते५० % क्षेत्र गंभीररीत्या बाधित झाले आहे. काेरडवाहू व माळभागातील पिकांचे उत्पादन ५० टक्केपेक्षा जास्त घटण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून शासकीय तांत्रिक निकषांच्या त्रुटींमुळे प्रत्यक्ष झालेले नुकसान दुर्लक्षित राहिल्याने हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली हाेती.
त्या अनुषंगाने बुधवारी मंत्रीमंडळ उपसमितीच्या पार पडलेल्या बैठकीत झालेल्या चर्चेत दुष्काळी परिस्थितीवर उपाययाेजना करण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत हातकणंगले तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याचे स्पष्ट झाले असून त्यानुसार पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. पिकांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल तातडीने शासनास सादर करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनीता वेद-सिंगल यांनी दिले आहेत.