रत्नागिरी :नियाझ खान
दि.२९ : ह्युंदाई कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बहुप्रतीक्षित ‘बेयॉन’ या नव्या कारचे रत्नागिरीतील नामांकित ‘माई ह्युंदाई’ शोरूममध्ये उत्साहात अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी माई ह्युंदाईचे कोकण व्यवसाय प्रमुख विनोद म्हात्रे, विक्री प्रमुख समीर सुर्वे, सहाय्यक व्यवस्थापक आनंद लिमये, प्रसिद्ध आंबा व्यावसायिक अशोक लांजेकर आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे सीपीसी प्रमुख राघवेंद्र मिश्रा उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी ह्युंदाईच्या जागतिक दर्जाच्या डिझाईन, आधुनिक शैली आणि प्रगत तंत्रज्ञानाचे कौतुक केले. रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली परिसरात माई ह्युंदाईने ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देत विश्वास संपादन केला असल्याचे त्यांनी नमूद केले.जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी वाहनांच्या आधुनिक तंत्रज्ञानासोबत वाहतूक नियमांच्या पालनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाहन चालवताना वेगापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. डाव्या बाजूने वाहन चालवणे, वळण घेताना नियमांचे पालन न करणे अशा निष्काळजीपणामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित सुविधांनी सुसज्ज असलेल्या बेयॉन कारचे आकर्षक डिझाईन आणि आधुनिक फिचर्स पाहण्यासाठी स्थानिक उद्योजक, वाहनप्रेमी आणि ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थितांनी या नव्या कारच्या आकर्षक लुक आणि अत्याधुनिक सुविधांचे कौतुक केले.