इचलकरंजी : हबीब मुल्ला
दि.२९ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या ३४ व्या ऊस गाळप हंगामासाठी गुरुवारी कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या हस्ते काटा, गव्हाण आणि मोळी पूजन करण्यात आले.
कारखान्याकडे २०२६-२७ हंगामाकरीता सुमारे २० हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. आज काटा पूजन, गव्हाण पूजन आणि मोळी पूजनाचा मुहूर्त केलेला आहे. हंगाम सुरू करण्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी चालू गाळप हंगामात आपला पिकविलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी केले. चालू गळीत हंगामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. यावर्षीचा मान्सून पाऊस पुरेसा झाला नसल्याने दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई भासणार असल्याने पिण्याचे पाणीदेखील अतिशय काटकसरीने वापरावे लागणार आहे. पाटबंधारे खात्याकडून शेतीसाठीच्या पाण्याची शासनाकडून जलजागृती केली जात आहे. अशा अवर्षण परिस्थितीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागणीनुसार बिनव्याजी उधारीवर ऊस शेतीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा, सल्ला व मार्गदर्शन कारखान्याकडून नेहमी देण्यात येते. कृत्रिम बुध्दिमता योजना व ड्रोन फवारणी आणि ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासो चौगुले, सर्व संचालक, माजी चेअरमन उत्तम आवाडे, आमदार राहुल आवाडे महापौर उदय धातुंडे, स्थायी सभापती सतीश मुळीक, नगरसेवक राजू बोंद्रे, विठ्ठल चोपडे, सुशांत कलागते, प्रमोद बचाटे, नागेश पाटील, ओंकार सुर्वे, नितेश पोवार, योगेश पाटील, प्रसाद इंगवले, रविंद्र जावळे, प्रशांत नवनाळे, सौ. मनिषा नवनाळे, मनोज साळुंखे, दिपक रावळ, सौ. सपना भिसे, संतोष शेळके, बाळासो कलागते, अहमद मुजावर, प्रकाश सातपुते, सौ. सिमा कमते, हुपरीचे नगराध्यक्ष मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष बाळासों रणदिवे, नगरसेवक अमेय जाधव, अॅड. राजेंद्र सुतार, रोहित शेट्टी, संदीप आवटे, आण्णासो शेंडुरे, संतोष वाळवेकर, अमर माने, डॉ. स्वप्निल हुपरीकर, मोहन वाईंगडे, उदय पाटील, प्रकाश जाधव, सुभाष माळी, देवाप्पा मुधाळे, विजय माळी, जंबूकुमार देसाई, श्रीमंधर चौगुले, शितल ऐतवडे, रावसाहेब पाटील, माजी संचालक रावसाहेब मुरचिट्टे, जयपाल उगारे, रांगोळीच्या सरपंच सौ. संगीता नरदे, तळंदगे पाणी पुरवठाचे अध्यक्ष सुरेश भोजकर, आनंदा माळी, तात्या उगळे, अभय बुगटे आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, सर्व अधिकारी उपस्थित होते.