डोंबिवली: प्रतिनिधी
दि.१९:भारतीय जनता पक्ष चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी भेट घेतली. यावेळी चव्हाण यांनी म्हस्के यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक केले.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कडवई गटातून विनोद म्हस्के यांनी निवडणूक लढवली होती. अल्प फरकाने पराभव झाला असला तरी त्यांनी दिलेल्या चुरशीच्या लढतीची प्रदेशाध्यक्षांनी दखल घेत, त्यांच्या जिद्द व कार्यपद्धतीचे अभिनंदन केले.
याप्रसंगी रवींद्र चव्हाण यांनी पराभवामुळे खचून न जाता अधिक जोमाने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कामाला लागावे, असा संदेश दिला. “पक्ष म्हणून आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना विनोद म्हस्के म्हणाले, “मा. रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेला विश्वास आणि मार्गदर्शन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आम्ही नव्या उमेदीने पक्षासाठी काम करू आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.”या भेटीनंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कडवई परिसरात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.