हातकणंगले: अब्दुल नदाफ
दि: १० नोव्हेंबर वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी इनामी जमीन नसल्याबाबतचा शेरा देण्याकरिता तक्रारदाराकडून अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना हातकणंगले येथील महसूल सहाय्यक वर्ग-३ चे रमेश राठोड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आज सापडले
हातकणंगले येथील महसूल सहाय्यक वर्ग-२ चे कर्मचारी रमेश दगडू राठोड याने तक्रारदाराची वर्ग-2 ची जमीन एक करण्याकरता इनामी जमीन नसल्याबाबतचे शेरा देण्याकरता तक्रारदार यांचेकडे ३ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ती अडीच हजार रुपये रक्कम द्यायची ठरली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यासाठी सापळा रचला होता. त्याप्रमाणे रमेश राठोड याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीज हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार संजीव बंबर्गेकर, सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील यांनी केली.