तारदाळ : कयुम शैख
दि.२०: महावितरणच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून ३८ युनिट वीज चोरी केल्याप्रकरणी तारदाळ येथील महादेव सुबराव सपकाळ (वय ५८, रा. श्रीकृष्णनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता श्रीकृष्णनगर, तारदाळ येथे वीज चोरीचा प्रकार घडला. आरोपीने महावितरण कंपनीची फसवणूक करून आर्थिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज वापरल्याचा आरोप आहे.
या वीज चोरीमुळे एकूण ३८ युनिट विजेचा अनधिकृत वापर झाल्याचे निदर्शनास आले असून, चोरी केलेल्या विजेची किंमत १ हजार ११० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी संदीप अधिकराव थोरात (वय ४१, रा. स्टारनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.०६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरण पूर्वी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंदवून पुढील कारवाईसाठी शहापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.गुन्हा रजिस्टर नंबर ४१४/२०२६ असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल १६३१ पाटील यांनी केली. पुढील तपास पी.एस.आय. कुटे करीत आहेत.