एन. एम. एम. एस. परीक्षेत श्रीमंत गंगामाई प्रशालेचे यश:

इचलकरंजी : विजय मकोटे

दि .२९ एप्रिल २०२६ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने डिसेंबर २०२५ मध्ये इ.आठवीसाठी घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. परीक्षेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील कु.तन्वी रायगोंडा पाटील व कु. आरजू ताजुद्दीन मुल्ला या दोन विद्यार्थिनी एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती प्राप्त ठरल्या आहेत. त्या शासनातर्फे मिळणाऱ्या ९६००० रुपये शिष्यवृत्तीच्या मानकरी ठरल्या आहेत. प्रशालेची या परीक्षेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत,एकूण प्रविष्ट विद्यार्थिनींपैकी ८७.८० % विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.


यशस्वी विद्यार्थिनींना श्री ना. बा.एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन उदयजी लोखंडे, ट्रेझरर महेश बांदवलकरसो, मानद सचिव बाबासो वडिंगे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर, विश्वस्त अहमद मुजावर तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका व्ही.एस .लोटके, पर्यवेक्षक एस. एस. कोळी,एन.एम. कांबळे,ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही.जी.पंतोजी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना विभाग प्रमुख जी. पी. पाटील व सर्व शिक्षक बंधुभगिनींचे मार्गदर्शन लाभले