इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२९ “: जनगणना २०२७ करिता इचलकरंजी शहरासाठी एकुण ४९६ ब्लॉक तयार करणेत आलेले आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात दि.१६ मे ते दि.१४ जुन २०२६ या कालावधीत घरगणना करणेत येणार असुन याकरिता इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात एकुण ५११ प्रगणक तसेच ८७ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना कामकाजासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना दिनांक २७ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत पहिले सत्र, दिनांक २ मे ते ४ मे २०२६ या कालावधीत दुसरे सत्र आणि दिनांक ६ मे ते ८ मे २०२६ या या कालावधीत तिसरे सत्र अशा तीन सत्रात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण या कामी नियुक्त केलेल्या एकुण १० फिल्ड ट्रेनर यांचे मार्फत डी. के. ए. एस. सी. महाविद्यालय, श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविदयालय, डी.के.टी.ई. इंग्लिश मेडीयम हायस्कुल तसेच बालाजी हायस्कुल या ठिकाणी देणेत येत आहे. सदर प्रशिक्षणाची सुरुवात सोमवार दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी झालेली असुन सदर प्रशिक्षणा दरम्यान मा. रमेश भोसले, जॉईंट डायरेक्टर, जणगनणा संचालनालय, महाराष्ट्र आणि मा. मुकेश कुमार, समन्वयक जणगणना संचालनालय, यांनी सर्व प्रशिक्षण स्थळांना भेट देवुन जनगणना कामकाजासाठी नियुक्त केलेल्या प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी नंदु परळकर, उपायुक्त शहर जणगणना अधिकारी, रोशनी गोडे, सहा. आयुक्त तथा चार्ज अधिकारी त्याचबरोबर सर्व अति. चार्ज अधिकारी यांचेसह विजय राजापुरे, समन्वयक जनगणना आदी उपस्थित होते.