नागपूर: नंददत्त डेकाटे
दि:22 नोव्हेंबर ला माननीय हर्षा नंद भगत वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा महासचिव ग्रामीण यांच्या नेतृत्वात माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मंत्रालय मुंबई यांना उमरेड तहसीलदार साहेब यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले
निवेदनात सदर मागण्या करण्यात आल्या धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावे . ‘पैगंबर मोहम्मद बिल’ वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
न्यायालयाने मान्यता दिलेले 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.
महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याऱ्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
सारथी-बारटी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.
या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी उमरेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आले
हर्षा नंद भगत ,सुरेश नेवारे, प्रवीण गणार ,अहमद शेख ,अलीम शेख ,वसीम अन्सारी ,आंबेत अन्सारी ,शैलेश लोखंडे विलास नेवारे, शंकर नेवारे ,सुनील बंजारी ,दुर्योधन मेश्राम ,विनय वंजारी, शशिकांत केतकर ,अमोल भाऊ बतुलावर ,मनीष गायकवाड ,समीर गोडघटे ,मुकेश बहादुर ,हर्षु मस्के ,दिनेश कांबळे, विनोद वाघमारे ,दिनेश लुटे, जितू वाघाडे ,संदीप सहारे, रुपेश नेवारे ,गोविंदा नेवारे ,शंकर सोनवणेइ तर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते