इचलकरंजी:विजय मकोटे
दि .३० जून २०२६: इचलकरंजीचे सुपुत्र आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ताजुद्दीन खतीब यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) – इंटकच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महालक्ष्मी ग्रुप ऑफ मीडियाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदनपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी महालक्ष्मी ग्रुप ऑफ मीडिया व महालक्ष्मी टाइम्सचे समूह संपादक फिरोज शेख, पत्रकार सलीम मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते शफिकभाई मणेर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी ताजुद्दीन खतीब यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी बोलताना महालक्ष्मी ग्रुप ऑफ मीडियाच्या प्रतिनिधींनी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी, कर्तृत्ववान महिला तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांचा सन्मान करण्याची परंपरा महालक्ष्मी टाइम्सने सातत्याने जपली असल्याचे सांगितले. समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देणे आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.सत्काराबद्दल ताजुद्दीन खतीब यांनी महालक्ष्मी ग्रुप ऑफ मीडियाचे आभार मानत, कामगारांच्या हक्कांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ग्वाही दिली