डीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि .१ जुले २०२६ – येथील डीकेटीई संस्थेच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग विभागातील तेजस फिरंगे व विश्‍वदीप संपकाळ या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखन्नीय यश संपादन करत देशातील अग्रगण्य आयटी कंपनी झेन्सार टेक्नॉलॉजीजमध्ये वार्षिक १० लाख रुपयांच्या आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे.चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्य आणि गुणवत्तेच्या जोरावर ही उल्लेखन्नीय कामगिरी नोंदवली. प्रतिष्ठीत बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची निवड होणे ही संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची ठोस साक्ष मानली जात आहे.
झेन्सार टेक्नॉलॉजीज ही जागतिक स्तरावर डिजीटल ट्रॉन्सफॉरर्मेशन, क्लाउड टेक्नॉलॉजी, डेटा इंजिनिअरींग आणि आयटी सोल्यूशन्स क्षेत्रात कार्यरत असलेली नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी आहे. विविध देशांमध्ये कार्यरत असलेल्या या कंपनीने तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. डीकेटीईमधील अत्याधुनिक प्रयोगशाळा, उदयोगाभिमूख अभ्यासक्रम, अनुभवी प्राध्यपकांचे सक्षम मार्गदर्शन आणि कौशल्यविकासावर दिला जाणारा सातत्यपूर्ण भर यामुळे येथील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखन्नीय यश मिळवत आहेत. यापूर्वीही डीकेटीईमधील विद्यार्थ्यांनी ४५ लाख, ४२ लाख, २५ लाख, २२ लाख व १८ लाख इतक्या पॅकेजवर नामांकित कंपन्यामध्ये निवड मिळवून संस्थेचा गौरव वाढवला आहे त्यामुळे देश विदेशातील अनेक प्रतिष्ठीत कंपन्याचे लक्ष डीकेटीईकडे वेधले जात आहे.
विद्यार्थ्यांचे हे यश डीकेटीईच्या शैक्षणिक गुणवत्ता, उद्योगस्नेही शिक्षणपध्दती आणि उत्कृष्ट प्लेसमेंट संस्कृतीचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेज देणा-या देशातील अग्रगण्य संस्थामध्ये डीकेटीईचा समावेश होत असून, ही बाब इचलकरंजीसह संपूर्ण डीकेटीई परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रीया संचालिका डॉ एल.एस.आडमुठे यांनी व्यक्त केली.
या यशाबददल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ डी.व्ही.कोदवडे, टीपीओ प्रा. जी.एस.जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.