इचलकरंजी : विजय मकोटे
दि.३ जुलै २०२६ :इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उत्कृष्ट विभाग, विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक या मान्यवरांच्या हस्ते तसेच परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, समाज कल्याण सभापती रुबन आवळे, नगरसेवक संतोष शेळके, नगरसेविका विजया महाजन, वैशाली मोहिते, स्नेहल रावळ,उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परिक्षक आरती खोत, सहा आयुक्त रोशनी गोडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली.
त्यानंतर महानगर पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गीत, नृत्य या कलाप्रकारांनी कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचा, विभाग प्रमुखांचा तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. नागरिकाभिमुख सेवा, कार्यक्षम प्रशासन आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचारी खालील प्रमाणे
१.उत्कृष्ठ कार्यक्षमता (वैयक्तीक) :-योगेश कोंडेकर, लिपिक, प्रमोद कामत, लिपिक संदिप कांबळे, रोखपाल
२.उत्कृष्ठ कार्यक्षमता (सांघिक) :-दिनेश नगरकर व घर फाळा वसुली पथक, कविता सोळंकी व टाकाऊतुन टिकाऊ पथक, सुभाष आवळे व अतिक्रमण निर्मुलन पथक
३. वैयक्तीक/कार्यझेप :- वरुणतीर्थ कल्लाप्पा चुनारी, लिपीक, संदिप विनायक जेरे, लिपीक, नरेंद्र विकास खांडेकर, लिपीक
४.उंच उडी सांघिक/कार्यक्षेप :-सुधीर भुपाल कांबळे, पाणी स्वच्छता पथक, महादेव मारुती धनवडे, स्वच्छता तक्रार निवारण पथक, किरण मारुती लाखे, गटारावरील अतिक्रमण हटाव पथक व श्रीहर्ष संजय माळगे, भुयारी गटर,
५.प्रेरणादायी कर्मचारी :- चंद्रकांत शिवाजी लोखंडे, स.का., रणजीत दत्तात्रय आवळे, स.का., रोहण अभिमन्यु कुरणे, स.का., शेखर चंद्रकांत वराळे, स.का.,
बबन लक्ष्मण देवकर, शिपाई, सुमिच्छा सुनिल सुर्यवंशी, प्र.लिपीक
६.उपक्रमशिलता :- अभयकुमार शिरोलीकर, कार्य अभियंता पापू, कविता सोळंकी, प्र.स्व.निरिक्षक, उमेश कांबळे, स्व.निरिक्षक, अनिलकुमार पुंडलिक सुतार, सर्व्हेअर, सुमन युवराज चौगुले, अनुरेखक
७.उत्कृष्ठ विभागप्रमुख :- सुनिल शिंदे, प्र.विभागप्रमुख आस्थापना, राहूल पोटे, नगरसचिव , दिपक
खोत, प्र.कर अधिकारी
८.अष्टपैलू :-
बाजीराव आण्णाप्पा कांबळे, प्र.शहर अभियंता, रामचंद्र वामन कांबळे, उपलेखापाल, संदिप वामन जोशी, व.लिपीक, आकाश माने, लिपीक, आयुब दादासो शेख, व.लिपीक,
९.उत्कृष्ठ सहकार्यता :-
सतीश मारुती कांबळे, स.का., मारुती हिंदुराव जावळे, स.का., परशराम मारुती पोवार , शिपाई,ऐश्वर्या जगदीश गंगावणे, शिपाई, राकेश जयवंत कांबळे, स.का. विनायक विठ्ठल कांबळे, स.का.
१०.समर्पित सेवा :-
आकाश बापू पाटील, लिपीक, नंदकुमार माळगे, लिपीक, प्रथमेश यशवंत कोकरे, लिपीक, प्रकाश राजाराम कुंभार, सदाशिव जाधव, वरिष्ठ लिपिक लिपीक,राजश्री श्रावण जाधव, लिपीक
११.विशेष प्राविण्य व नाविण्य :- संजय कांबळे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, महेंद्र क्षिरसागर, मानसेवी शहरअभियंता, अजय सुतार, मानसेवी संगणक अभियंता, श्रीमती भावना देवडा, मानसेवी विधी अभियंता, बाळकृष्ण व्हनखंडे, समुह संघटक
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले लोकप्रतिनिधी, अधिकारी / कर्मचारी खालील प्रमाणे
क्रांती आवळे नगरसेविका, सयाजी चव्हाण नगरसेवक, अब्राहम आवळे मा.नगरसेवक, विकास खोळपे मुख्य लेखाधिकारी, धनंजय पळसुले रामचंद्र कांबळे , कृष्णा आवळे ,उमेश कांबळे,
संदिप कांबळे, शितल पाटील , अविनाश मोरे , पियुश लालबेग, नवनाथ जाधव, हरिष कांबळे , जयपाल कांबळे, संजय कांबळे, युवराज भोसले, खेमचंद लालबेग, किशोर खोत, शाख्यानंद कांबळे, अमोल कुलकर्णी, वेदांत ढेरे, विनोद कांबळे, संदेश बंडगे शोभा लोकरे, नवनाथ आवळे आदिंनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे दरम्यान इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०२६ चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात महानगर पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करताना भविष्यातही अशीच समर्पित सेवा देत शहराच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार समारंभामुळे वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले