रोशन बैतूलमाल कमिटीच्या वतीने ८० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

इचलकरंजी :हबीब शेख 

दि .१५ : रोशन मस्जिद, जवाहरनगर येथे रोशन बैतूलमाल कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच चार गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत देत धनादेश प्रदान करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एजाज सुलेमान सय्यद, नजीर ईसाक फकीर, दिवाना सेलचे मालक वसीम कमलीवाले तसेच मुसाअलि मुल्ला सर उपस्थित होते.

          यावेळी डॉ. एजाज सय्यद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. नजीर फकीर यांनी रोशन बैतूलमाल कमिटीच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करून कमिटीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोशन बैतूलमाल कमिटीचे अध्यक्ष मोबीन मुजावर, सरफराज खलिफा, आलम सर्जेखान, जुबेर मांगलेकर, अजहर संजापुरे, सोहेल खाटीक, हाफिज फकीर, शफीक मुल्ला आणि हारून मोमीन यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरफराज खलिफा यांनी केले, तर आभार मोबीन मुजावर यांनी मानले.