इचलकरंजी :विजय मकोटे
दि .२०: मारवाडी युवा मंच मिड टाऊनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी तसेच इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी नूतन अध्यक्षा अनुराधा काबरा, सचिव उर्मिला काबरा व कोषाध्यक्ष गीता भुतडा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना ललित गांधी यांनी युवा पिढीने सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या विकासासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. युवकांनी संघटितपणे कार्य करून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सामाजिक कार्यासोबतच युवकांनी कायद्याचे व वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच समाजात सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. पोलीस दलाच्या वतीने व्यसनमुक्ती, महिला सशक्तीकरण यांसह विविध उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून पोलीस दलाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास उद्योजक सुनील पाटणी, श्रवण जैन, रामकिशोर वर्मा, ओमजी पाटणी, पूनमजी दरगड, गोपालजी, सुरेशजी दरगड, पन्नालाल दल्या, किशोर मूंदडा, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगांवे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा रेखा सारडा, मारवाडी युवा मंचच्या माजी अध्यक्षा हेमा डाळ्या, अनिता जैन, कविता डाळ्या, श्वेता डाळ्या, रेणू झंवर, संगिता मुंदडा, प्रणिता डाळ्या यांच्यासह मंचचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांनी मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभा पाटणी व रुचिका यांनी केले, तर आभार उर्मिला काबरा यांनी मानले.