संगमेश्वर : वहाब दळवी
शेतकरी कष्टकरी संघटनेचे व जिल्हा कॉग्रेसचे नेते अशोकराव जाधव यांनी 2O डिसेंबर 2O21 ला रस्ता रोको अंदोलनाची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि दि ९ डिसेंबर पासुन सार्वजनिक बांधकाम विभागाने वतीने शिरगाव ते पाटण कुभांर्ती घाटातील रत्नागिरी जिल्हातील हद्यीपर्यंतचे रस्त्याचे काम चालू केले आहे आता पाटण पर्यंतचे ही काम लवकरात लवकर करणार असलेचे कऱ्हाड कार्यकारी अभियंता यांनी सांगितले आहे .
सदर काम अशोकराव जाधव यांनी रस्ता रोको आंदोलनाची हाक दिल्या नंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनीक विभागाचे महाराष्ट्राचे मंत्री ना . अशोकराव चव्हाण यांनी रस्ता तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करा व काम चालू केले असल्याचे फोटो पाठवा अशा सुचना थेट देण्यात आल्या बरोबर यंत्रना हलली व काम चालू केलेचे फोटो पाठविण्यात आले . सदर काम चालू झाले बद्यल व रत्नागिरी जिल्हातील चिपळूण , गुहागर , खेड , संगमेश्वर , दापोली , मंडणगड या तालुक्यांची वाहतूक व्यवस्था चांगली होत असले बद्दल व्यापारी संघटना , वाहतूकदार संघटना , खाजगी वाहनधारक , नागरीक , प्रवासी संघटना यानी मंत्री अशोकराव चव्हान यांचे अभिनंदन केले आहे तसेच शिरगाव ते पाटण या रस्ता दुरुस्ती बद्दल Iअशोकराव जाधव अध्यक्ष शेतकरी . कष्टकरी संघटना आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे आणि त्यांचे साथिदार विश्वनाथ किल्लेदार , महादेव चव्हाण , सुनिल सावर्डकर, लियाकत शहा , भरत लब्धे , भुषण शिंदे , अल्पेश मोरे , निर्मलाताई जाधव ,मैनुद्यीन सय्यद , अॅड जिवन रेळेकर , गौरी रेळेकर, सुधिर शेठ शिंदे , आर्या कदम , अश्विनी भुस्कुटे इत्यादी असंख्य कार्यकर्ताचे अभिनंदण होत आहे .