जैनापूर: राम आवळे
दि १ : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.संदीप फाऊंडेशन कृषी महाविद्यालय, नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांतील महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला. बक्षीस वितरण कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे माजी अधिष्ठाता डॉ. जे. बी. भाकरे तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते.
शरद कृषी महाविद्यालयाच्या संघात कर्णधार श्रुती शिंदे यांच्यासह प्रगती कर्नाळे, अक्षता सावंत, श्रेया पाटील, सृष्टी जक्कनवार, जान्हवी बंडगर, साक्षी आबाळे आणि आफ्रिन पेंढारी यांचा समावेश होता. या खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत पाटील, उपप्राचार्य प्रा. संजय फलके आणि क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.