इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि. ३ :कोरोची (ता. हातकणंगले) येथे घरामध्ये महिलेला ग्राहक पुरवून वेश्याव्यवसाय चालविल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पूजा अभिजीत पाटील (रा. शिवाजीनगर, कोरोची, ता. हातकणंगले) हिला अटक करण्यात आली असून, तिच्याकडून रोख रकमेसह तीन मोबाईल हँडसेट व निरोधाची पाकिटे असा एकूण २८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोची येथील चव्हाण सायझिंगजवळील शिवाजीनगर परिसरातील एका घरात हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. यावेळी संशयित महिला ग्राहकांना बोलावून देहव्यवसायासाठी प्रवृत्त करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईत २ हजार रुपयांची रोख रक्कम, ५०० रुपयांच्या चार चलनी नोटा, ४० रुपयांची निरोधाची दोन पाकिटे, १० हजार रुपयांचा Redmi Note 14 Pro 5G मोबाईल, १० रुपयांची निरोधाची एक पाकीट, १० हजार रुपयांचा Vivo Y100 मोबाईल, ५ हजार रुपयांचा POCO C71 मोबाईल तसेच ११९० रुपयांच्या विविध चलनी नोटा असा एकूण २८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४, ५, ६ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला १ ऑक्टोबर रोजी रात्री १०.५६ वाजता अटक करण्यात आली असून, ३ ऑक्टोबरपर्यंत ती पोलिस कोठडीत असल्याची नोंद आहे. या प्रकरणी सहायक फौजदार सुवर्णा सागर गायकवाड यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस अधिकारी गजेंद्र लोहार करीत आहेत.