गंगामाईच्या जलतरण स्पर्धेमध्ये वैष्णवी घाडगे हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि.३: जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय जलतरण स्पर्धा गुरुवार दि.1 ऑक्टोबर 2026 या दिवशी शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनींनी वैष्णवी घाडगे इयत्ता दहावी हिची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशस्वी कामगिरीसाठी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकरसो, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमनकर साहेब तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सौ विद्या लोटके, उपमुख्याध्यापिक श्री एस एस कोळी, उप प्राचार्य सौ सुजाता कवळेकर, पर्यवेक्षिका श्रीमती हेमांगी संकपाळ, पर्यवेक्षक श्री विकास कांबळे ज्येष्ठ शिक्षक श्री डी डी कोळी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले. जिमखाना प्रमुख श्री बी एस माने सर, वेटलिफ्टिंग चे प्रशिक्षक उत्तम मेंगणे सर,क्रीडा शिक्षक के ए पाटील सर व व्ही. के पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.