बिल्डर्स असाेशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजीतर्फे नंदिनी काेकळकी हिचा सत्कार

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि .४ : इचलकरंजीची सुकन्या कु. नंदिनी महांतेश कोकळकी हिने बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (बी.आर्क.) हा अभ्यासक्रम पूर्ण करून विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठ, बेळगावी अंतर्गत सर्व संलग्न महाविद्यालयांमधून विद्यापीठाच्या प्रथम दहा क्रमांकांत स्थान मिळविल्याबद्दल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इचलकरंजी सेंटरच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

     बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इचलकरंजी सेंटरचे चेअरमन शितल काजवे, ट्रस्ट चेअरमन नितीन धुत, माजी चेअरमन फैयाज गैबान यांच्या हस्ते नंदिनी कोकळकीचा सत्कार करून तिचे अभिनंदन करण्यात आले. इचलकरंजीतील इंजिनिअर महांतेश कोकळकी यांची कन्या नंदिनी हिने बेंगळुरू येथील बी.एम.एस. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची पदवी संपादन केली. त्याचबरोबर विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठांतर्गत संलग्न महाविद्यालयांमधून प्रथम दहा क्रमांकांत स्थान मिळवून तिने इचलकरंजीच्या शैक्षणिक क्षेत्रातही मान उंचावला आहे.

नंदिनीने मिळविलेले यश हे तिच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि शैक्षणिक गुणवत्तेचे फलित असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी पुंडलिक जाधव, राजेंद्र खंडेराजुरी, महेश महाजन, भगवान कांबुरे, पन्नालाल डाळ्या, मोहन सातपुते, संजय रुग्गे यांच्यासह बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.