येणाऱ्या काळात इचलकरंजी विधानसभेवर भगवा फडकवू!

उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील; शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता व BLA मार्गदर्शन मेळावा

इचलकरंजी :अन्वर मुल्ला 

दि.३: येणाऱ्या काळात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करून पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले. इचलकरंजी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कार्यकर्ता व BLA मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रा. नितीन बानुगडे पाटील व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक उद्धव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकसभा संपर्कप्रमुख महेश इंदुलकर होते.

        यावेळी उद्धव कदम यांनी शिवसैनिकांना आगामी काळातील पक्षबांधणी तसेच एस.आय.आर. संदर्भात मार्गदर्शन केले. महेश इंदुलकर, राज्यसंघटक नवेज मुल्ला, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे यांनी पक्षवाढीसाठी संघटनात्मक कामकाज आणि पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.मेळाव्यास शिवसैनिकांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी शिवसैनिकांची पक्ष संघटनेतील घटनात्मक पदांवर नियुक्ती करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

       यावेळी राज्यसंघटक प्रदीप उपाध्याय, महिला संपर्क संघटिका वर्षाताई ठोंबरे, तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका मंगलताई मुसळे, तालुका संघटिका शोभा गोरे, माजी नगरसेवक मनोज भाट, युवासेनेचे अविनाश वासुदेव, अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, ज्येष्ठ शिवसैनिक आप्पासो पाटील, उमेश पाटील, भरत शिवलिंगे, विजय जोशी, बसय्या स्वामी, राजेंद्र मोकाशी, शहर संघटिका शोभा कोलप, स्नेहल मस्के, मधुमती खराडे, स्नेहा दरीबे, सकिना भाट, परवीन मुजावर, शोभा माने, रशीदा कोलार, कुमार धप्पाधुळे, अरविंद मस्के, पवन मेटे, संतोष लवटे, शाहरुख मुजावर आदी उपस्थित होते.