कोल्हापूर: प्रविण भोसले
दि.५: सेवा संकल्प अभियान व पोषण माहनिमित्त गारगोटी, ता. भुदरगड येथे भरड धान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी स्पर्धेला भेट देऊन सहभागी महिला व नागरिकांशी संवाद साधला. भरड धान्याचा आहारातील वापर वाढवून पौष्टिक व संतुलित आहाराच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.स्पर्धेत महिलांनी भरड धान्यापासून विविध पौष्टिक व रुचकर पदार्थ तयार करून सादर केले. दैनंदिन आहारात भरड धान्याचा समावेश केल्यास कुटुंबाच्या पोषण व आरोग्याला चालना मिळते, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.