इचलकरंजी: विजय मकोटे
दि :९ राजकिय आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होण्याची शक्यता आहे. ती ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. आमचे आरक्षण कायम ठेवावे आणि 50 टक्क्याच्या आत आरक्षण रहावे, त्याचबरोबर राज्यातील अठरा पगड जातीमध्ये कोष्टी समाज असून त्यामधील पारंपारिक विणकाम करणार्यांना विशेष सवलती मिळाव्यात आदी विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई यांच्यावतीने अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.
गृह राज्यमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील हे कार्यक्रमाच्या निमित्ताने इचलकरंजीत आले असताना महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळच्या वतीने त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, सचिव संजय कांबळे, महेश सातपुते, मिलिंद कांबळे, गजानन होगाडे, भाऊसो साखरे, मनोज खेतमर, राहुल सातपुते, प्रशांत सपाटे, प्रमोद मुसळे, पंडीत ढवळे, श्रीनिवास सातपुते आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. निवेदनात, सन 1994 सालापासून कोष्टी समाजाला एसबीसी चे 2 टक्के आरक्षणाचा लाभ होत आहे. तो कायम ठेवावा आणि 50 टक्केच्या आत आमचे आरक्षण रहावे. त्याबरोबरच राज्यातील अठरा पगड जातीमध्ये कोष्टी समाज असून त्यामधील पारंपारिक विणकाम करणार्यांना शासनाकडून विशेष सवलती मिळाव्यात, असे म्हटले आहे.