सांगली :मयुरी देशपांडे
दि .(१५नोव्हेंबर, २०२६):महर्षी वाल्मिकी चारिटेबल ट्रस्ट, सांगली यांचेकडून बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित २५ व्या आदिवासी कोळी महादेव जमात वधुवर मेळाव्यात सांगली जिल्ह्याकडून दरवर्षी दिला जाणारा समाजिक क्षेत्रातील “आदिवासी कोळी भूषण ” पुरस्काराने डॉ दशरथ भांडे, माजी कॅबिनेट मंत्री यांना सन्मानीत करण्यात आले.
प्रकृती अस्वस्थ्यते मुळे आज डॉ भांडे उपस्थित राहू शकले नाहीत मात्र, त्यांच्यावतीने हा पुरस्कार प्रा बसवंत पाटील, माजी विभागीय अध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र ), डॉ डी एम भांडे प्रणित आदिवासी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांनी स्वीकारला.
या प्रसंगी, संस्थापक, श्री एकनाथ सूर्यवंशी यांनी प्रस्ताविक केले. सांगली जिल्हा बँकेचे नूतन संचालक श्री वैभव शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना प्रा पाटील यांनी, डॉ भांडे साहेब यांनी महाराष्ट्र कायदा – 23 /2000 विधानसभेत संमत होताना तब्बल 3 तासाहून अधिक काळ केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाचा कांही अंश सांगितला. तसेच, संघर्ष समिती व आदिवासी कोळी महासंघ यांच्या 2025-26मध्ये कार्यरत असलेल्या सर्व कार्यकारीण्या बरखास्त करण्यात आल्या असून तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत नव्याने नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या साठी इच्छुक जमात बांधवानी आपली नावे प्रशांत तारळे, सरचिटणीस यांचेकडे नोंदवावीत असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री वैभव शिंदे म्हणाले,” आरक्षण बाबत सर्व समाजाची सारखीच स्थिती आहे. आपले संवैधानिक हक्क हिरावले जात असतील तर त्याचा एकोप्याने मुकाबला करावे लागेल. ”
तसेच, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल समाज बांधवाचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्याला युवक व युवती मोठया संख्येने उपस्थित होते. श्री राजमाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.