इचलकरंजी: विजय मकोटे
दि:२२ डिसेबर :प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या कट्टीमोळा डोह योजनेच्या क्रॉस पाइप लाईनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा गुरुवार (23 डिसेंबर) पासून सुरळीत होत आहे. त्यामुळे एक दिवसआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी दिली.

तसेच पंचगंगा जॅकवेलमध्ये नवीन पंप बसविण्यात येणार असल्याने पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर होणार असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
ते म्हणाले, शहराला सातत्याने तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठ्याची समस्या जाणवत आहे. त्यातून मार्ग काढत शहरवासियांना एक दिवसआड पाणी मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. उन्हाळ्यात पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावत असल्याने आणि कृष्णा योजनेच्या मुख्य पाइप लाईनला गळतीच्या सत्रामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येतो. त्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने पंचगंगा नदीपात्रातच कट्टीमोळा डोह याठिकाणी पाणी पुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत त्याला मंजूरी आणून दिली. कट्टीमोळा डोह येथून पाइप लाईन टाकून ती पंचगंगा जॅकवेल येथील पाइप लाईनला जोडण्यात आली आहे. क्रॉस पाइप लाईनचे काम पूर्ण झाले असून पाणी उपसासाठी आवश्यक पंपही बसविण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारपासून शहरातील पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु होणार आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी असलेले पंप नादुरुस्त झाल्यानेही पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्याठिकाणी आवश्यक नवीन पंप बसविण्यात येणार असल्याने पाणी पुरवठ्यातील विस्कळीतपणा आणि अडचणी दूर होणार असल्याचेही सभापती सुर्वे यांनी सांगितले.

Post Views: 430