मुस्लिम ओ. बी. सी. समाजाच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी बी.एन.पाटील यांची शब्बीर अन्सारी यांनी घेतली भेट

कडवई :-मुजीब खान
दि १० जानेवारी :रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम ओ. बी. सी. समाजाच्या विविध समस्याचे गारणे ऑल इंडीया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनाइजेशनचे राष्टीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी यांनी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या समोर मांडून तात्काळ शासनाने काढलेल्या जि.आर नुसार अमलबजावणी करून मुस्लिम समाजाच्या लोकांना जातींचे दाखले देण्यात यावे अशी विनंती केली.
रत्नागिरी येथे दौऱ्यावर आलेले शब्बीरभाई अन्सारी यांनी रत्नागिरी जिल्हातील ओ. बी. सी. समाजातील समस्या तालुका तालुक्यातील लोकांची माहिती घेऊन लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील व अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन सगळ्यां समस्या सांगितल्या. त्यामध्ये खास करून राजापूर तालुक्यात मुस्लिम सामाज्याच्या दाखल्यां संदर्भात जाचक अटी असल्याचे जिल्हाधिकारी यांना संगण्यात आल्या. त्यांनी दखल घेत तात्काळ समस्या सोडवणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष हारीश शेकासन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष खतीजा प्रधान,उपाध्यक्ष जमूरत अलजी, सरचिटणीस रमजान गोलंदाज,रहीम दलाल सचिव जमीर खलिफे, संगमेश्वर उपाध्यक्ष तैमूर अलजी आदि उपस्थित होते.