इचलकरंजी: संजय आंबे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी कार्यकर्ता शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे,माजी आमदार राजीव आवळे, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आणि करत असलेले कार्य जनते पर्यंत पोचावे तसेच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून विधायक कामात कसे सक्रिय सहभागी राहून कार्य केले पाहिजे आणि आगामी काळातील निवडणुकीत राष्ट्रवादी चा झेंडा कसा फडकवला पाहिजे उद्देशाने मार्गदर्शन करण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. टाकवडे येथे पार पडलेल्या या कार्यक्रम मध्ये सर्व सेल च्या अध्यक्षा नी आपले मनोगत आणि सेल ने केलेले कार्य व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माजी आमदार राजीव आवळे उपस्थित होते.या सोबत शहर अध्यक्ष प्रकाश पाटील,विठ्ठल चोपडे,उदयसिंग पाटील, शहर महिला अध्यक्षा माधुरी चव्हाण,माधुरी सातपुते, दिपाली बेडकाले, शुभा कांबळे, यासीन मुजावर, बाळासाहेब देशमुख,अमर जाधव,संजय बेडकाळे, मंगेश कांबुरे,अशोक कांबळे,प्रधान माळी,अब्राहम आवळे, दत्ता देडे,हाफिज मुसा सनदी, अभिजीत रवदे, नागेश शेजाळे, नितीन कोकणे, सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी,मान्यवर, कार्यकर्ते, सहभागी झाले होते