‘हिजाब ‘  तो एक बहाना है

         

हिजाब  तो एक बहाना है ,,, 

हिसब तो गंदी सोच  और साजिश का  है !

कर्नाटकातील  शाळा कॉलेज मध्ये मुस्लिम  विद्यार्थिनींनी  हिजाब घालून येऊ नये अशी मागणी करीत, एहिजाब×भगवा  असा हिंदू-मुस्लिम धार्मिक रंग देतं  अतिरेकी पद्धतीने  चा
राडा करत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यापासून देशातील सर्व महत्वाच्या  बाबी,समस्या अडगळीत टाकून प्रसार माध्यमांनी फक्त आणि फक्त मिजास/बुरखा यावरच  कॅमेरे रोखले आहेत. एका अर्थाने हे मिशन यशस्वी झाले आहे असेच म्हणावे लागेल..!!
          अलिकडे देशात ज्या ज्यावेळी कुठे निवडणुका जाहीर होतात अथवा एखादा मोठा घोटाळा उघड होतो तेव्हां  अशा हिंदू-मुस्लीम तणावाचे कार्यक्रम प्रायोजित‌केले जातातच. पुर्वी दिलेल्या आश्वासन पुर्ती न झाल्यामुळे शासनकर्त्यांच्या बगल बच्चांकडून सामान्य जनतेने जाब विचारु नये यासाठी त्यांचे लक्ष विचलित करुन प्रसार  माध्यमांची सगळी यंत्रणा एखाद्या संवेदनशील जातीय/धार्मिक वाद उपस्थित करुन त्यावर केंद्रीत केली जाते.आणि ही रूढ झालेली प्रथा आता संपूर्ण  देशाला  नवीन राहिलेली नाही. कारण आता‌ देशात पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तसेच साधारण बावीस हजार आठशे कोटींचा घोटाळ्याची चर्चा सुरू झाल्यावरच ‘हिजाब’ च्या वादग्रस्त प्रकरणाच्या  मागील  खरा कावा  लक्षात येऊ लागला आहे.            
         हिजाबला विरोध  करणा-यांमध्ये अधिकतर  स्त्रियांना केवळ उपभोग्य वस्तू समजणा-या स्त्री लंपट मनु वृत्तीची मानसिकता असणा-यांचाच भरणा   आहे. ही प्रथा म्हणजे मुस्लीम महिलांवर लादली जाणारी गुलामी आहे असे य्हणणे हा  केवळ एक शुद्ध बुद्धिभेदच  नव्हे तर तो एक तद्दन मूर्खपणही आहे.    
आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचे पहायचे वाकून’ म्हणतात त्यातलाच हा प्रकार आहे. कारण शिंगणापूरचा शनी आणि शबरी मलाई डोंगरावर हिंदू महिलांची सावली देखील पाप अथवा  ईश्वराचा कोप म्हणून  त्यांना दूर रोखणारे अपमानित करणारेच आज ‘हिजाब’ म्हणजे महिलांवर लादलेली  गुलामगिरी म्हणून भेसूर गळा काढत आहेत.
   वास्तविक पाश्घिमात्यांचे फाजील अंधानुकरण ,नागडी- बेगडी आधुनिकता  आणि सभ्यता हीन नग्नतेला विरोध व्हायला हवा.  परंतु तसे‌ न होता हिजाब/बुरखा पद्धतीला विरोध केला जातोय ही खरोखरच एक दुर्दैवी बाब आहे. 
        मुस्लिम महिलांच्या पेहराव विषयी बोलायचे झाले तर प्राचीन संस्कृतीपासून आजतागायत बदलत्या काळानुसार
महिलांच्या  पोशाखात फॅशनच्या धर्तीवर आपापल्या  आवडीनुसार विविध डिझाईन्समध्ये अनेक प्रकारचे नवनवीन बदल विकसित होत आले आहेत.किथी ही बदल  जरी झाले असले  तरी बदललेले ते सर्व पेहराव हे  संपूर्ण शरीर झाकणारेच आहेत ही एक निर्विवाद गौरवास्पद गोष्ट आहे.
तेव्हा साहजिकच सभ्यतेला धरूंन सर्वात पहिला पेहराव डोळ्यासमोर येतो आणि  तो म्हणजे संपूर्ण शरीर झाकणारा ‘हिजाब /बुरखा.’ होय.  
         महिला मग त्या कुठल्याही धर्माचे असोत   या मुळातच आपल्या सौंदर्याविषयी फार दक्ष असतात.यानंतर आपल्या पोशाखातही वैविध्यता राखायचा त्या प्रयत्न करतात. तसे पाहता  केवळ मुस्लिमच नव्हे तर स्वतःला गर्व से हिंदु म्हणवुन घेणारे  उत्तरेकडील अनेक राज्यांत अनेक जातींमध्येही केवळ पर पुरूषच नव्हे तर घरातील पुरूष मंडळीपासून घूंघट ओढण्याची प्रथा आजही अस्तित्वात आहे.  प्रत्येकाच्या‌ घरात पडद्याची सोय देखील केलेली असते. पण जेव्हा त्यांना बाहेर जावे लागते तेव्हा पूर्ण शरीर झाकून बाहेर पडण्याची प्रथा मुस्लिम समाजात सुरू झाली.    
       नैतिकतेच्या दृष्टितुन पाहिले तर महिला आणि पुरुष दोघांनीही अनोळखी व्यक्तींंपासून  विशेष सावधानता बाळगत  कामाशिवाय अधिक श्रण न  पाहण्याचे आणि शरिराचे  समाजाने लज्जास्पद ठरविलेले स्थळ  झाकणे हे केव्हाही योग्यच. त्यायोगेच  महिलांना परंपरेनुसार स्पष्टपणे सामाजिक, शालीनतेघ्या पारंपारिक अशा सूचना,/सल्ले प्रत्येक पिढीला वेळौवेळी देण्यात आलेले आहेत.जर आवश्यकच बाब असेल तर त्यांनी त्यांच्या सुडौल अवयवांकडे  इतरांचे विशेष  लक्ष आकर्षित होऊ नये यासाठी त्यांनी ओढणी तत्सम  वस्त्र  गळा आणि छातीवर घालावे. अशा ही सूचना दिल्या जातात. याचाच सरळ सरळ अर्थ हिजाब/बुरखा  घालण्याची प्रथा म्हणजे  इस्लामिक सभ्यतेचा उत्तम  नमुना होय.
तशी स्त्रियांचे संपूर्ण शरीर झाकण्याची प्रथा ही इस्लामपूर्व काळापासून चालत आल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. 
पर्शियन-इराणी राजघराण्यातील स्त्रिया पूर्ण शरीर झाकत असत.  हीच प्रथा सर्वप्रथम सौदी अरेबियात आणि इस्लामच्या प्रसारानंतर इतर अनेक देशांमध्ये स्वीकारली गेली.असे असले तरी देखील आपल्या विषमतावादी मानसिकता आणि ‘ढोर गंवार पशु नारी, सब है ताडन के हारी ही नीच व्यवस्था आणणा-या आणि वैदिक धर्माचा पुरस्कार करणा-यांनी महिलांना आपली वक्ष स्थळं न झाकता  ती उघडी ठेवण्याची दुष्ट प्रथा सुरू केली होती मात्र खरा  नर केसरी शेर ए म्हैमूर टिपू सुलतान या महान राजाने ही लज्जस्पद  अमानवी प्रथा बंद करून महिलांना अंगभर कपडे परिधान करून आपले लज्जा रक्षण  करण्याचे  स्वातंत्र्य बहाल केले हा इतिहास आहे.मात्र आज टिपू सुलतानच्या पश्चात मनु समर्थकाच्या  मूठभर औलादी सर्व जाती धर्मांना, आपापली संस्कृती रुढी भाषा  परंपरा पाळण्याची मुभा देणारी जगातील सर्वश्रेष्ठ अशी भारतीय संविधान अस्तित्वात‌ असूनही त्यांचे पालन न करता त्याचा सन्मान न राखता पुन्हा आपली डोकी वर काढून सभ्यतेला विरोध करत नग्नतेचे दिवस पुन्हा आणु पहात  आहेत तेव्हा संविधान मानणा-या सर्वांनी एकत्र येऊन ही वृत्ती वेळीच ठेचणे गरजेचे आहे.
     बुरखा/हिजाबने संपूर्ण शरीर झाकलेले असून केवळ चेहरा दिसत असला तरी संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची ओळख होऊ शकते. देश-काळ-परिस्थितीनुसार बुरखा आणि हिजाबचे विविध नमुने तयार करण्यात आले असून आकर्षक हिजाब आणि बुरखा यांच्या  नवं नवीन फॅशन शोधण्यात आल्या आहेत.  ते परिधान करून महिला स्वतःला सजवत फॅशनचाही  आनंद घेतात.हिजाबने पुढचे केस झाकण्यासाठी काही जणांकडून विशिष्ट प्रकारची टोपी देखील घातली जाते. 
वस्त्रेदेखील आभूषणा समान असले तरी वरील प्रमाणे हिजाब आणि केस झाकणाऱ्या कपड्यांद्वारे मुस्लिम महिलांमध्ये विविध फॅशन रूढ झाल्या असल्या तरी  त्या सर्व सभ्यतेला धरून शरीराला घट्ट न बसता उठणे-बसणे  यात अवघड न वाटता सैल,सोपे,आणि संपूर्ण शरीराचा कोणताही भाग न दिसण्यासारखे परिधान केले पाहिजेत या अटीं कढे अधिक कटाक्ष असणे ही देखील सभ्यतेची लक्षणे आहेत.
बुरखा आणि हिजास ही  प्रथा सभ्यतेचा धरून  असल्यामुळे श्वापद वृत्तीची मानसिकता आणि  नजरांपासून सोय आणि सुरक्षिततेची जाणीव झाल्यामुळे आज मुस्लीमेतर  महिलांनाही त्यांचे महत्व  पटल्यामुळे त्याही सर्रास यांचे पालन करताना दिसतात.ही जर खरोखरच लादलेली गुलामी असती तर  सर्वच धर्मीय महिला आज  ‘हिजाब/बुरखा नसले तरी त्यासम वेशभूषा परिधान  केल्याच नसत्या हे सर्वांनी गांभीर्याने  लक्षात घेतले पाहिजे.   आपल्या लेकी सुनांना अशी वेशभूषा परिधान करू नका असे सांगण्याची धमक अंगात नसणारे  आणि उगाच कुणाचे तरी धार्मिक श्रेष्ठत्व  मानून त्यांच्या इशा-यावर चालणा-या  आणि स्वतः त्यांनी लादलेली भ्रम आणि मानसिक गुलामीची शाल पांघरलेल्या रिकामटेकड्या  लोकांचा नसता उद्योग म्हणजेच ‘हिजाब’ला विरोध होत.
         मुस्लिम महिलां प्रमाणेच आज सर्व महिलादेखील सभ्यता जपण्यात  भूषण मानतात आणि महिलांना  केवळ एक उपभोग्य वस्तू मानणा-यांनी हीच तर खरी  पोटदुखी आहे.’ याचाच अर्थ यह कमाल की का नहीं ‘कमल का मसला है
         बुरखा परिधान करण्याला विरोध करण्याचा विचार हा अचानक उसळी घेऊन समाजस्वास्थ्य बिघडणे ही काही सहज घडलेली  प्रतिक्रिया नाही तर ती अतिशय. नियोजनबद्ध रितीने सर्व आघाड्यांवर आलेले अपयश, हिंदुत्वाचा नगारा बडवून  तमाम बहुजनांच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळवून गरज  संपल्यावर त्यांना लाथाडल्यामुळे निर्माण झालेला  प्रचंड असंतोष थोपविण्यासाठी, घसरत चाललेली पत आणि त्यायोगे सैल होत चाललेली राजकारणा वरील पकड सावरुन होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हिंदूंची मतं बळकावण्यासाठी  आखलेली  धूर्त खेळी आहे.
उत्तर प्रदेश  सारख्या मोठ्या राज्यातून सत्तांतर होणार हे आता जवळपास निश्चित झालेले आहे.आणि केवळ त्यासाठी हिंदू-मुस्लीम हा जुनाच डाव नव्याने खेळला जात आहे.’हिजाब’ हे केवळ त्यांचे निमित्त आहे. हा खेळ प्रत्यक्ष त्या राज्यात खेळणे अवघड होते.कारण, नाही  म्हटले तरी ज्याला राजकारणातले थोडे फार कळते अशा सामान्यातील सामान्य जनतेलाही‌ ऐन होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर काही तरी घडायला हवे असा नव्याने नियम केला गेला आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे.काही वेळा तर पुलवामा सारखे बहादूर सैनिकांचा ही  निवडणुकीच्या  तोंडावर रक्त वाहून गेलेले संपुर्ण देशाने पाहिले आहे. त्यामूळे त्या राज्याऐवजी  भाजपाची सत्ता असल्यामुळे हा किडा कर्नाटकात सोडला गेला आहे.
 यामागे हिंदूंची मतं गोळा करण्याबरोबरच कलह माजवुन शैक्षणिक संस्था बंद पाडून बहुजन आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कूटिल कारस्थान या ‘हिजाब’ मागे आहे हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.
  एखाद्या शिक्षण संस्थेत काम नियम असावेत हे ठरविण्याचे आणि त्याप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांना सूचित करण्याचे काम संस्था चालकांचे आहे. विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून गुंडगिरी करणा-यांचे नाही.राजकीय हव्यासापोटी धार्मिक ऊन्माद तरुणांच्या अंगी बाणवली  जाणे ही अतिशय गंभीर बाब आहे, तरूण पिढी बरबाद करण्याचा  गलिच्छ खेळ करणा-यांच्या हातातील बाहुले बनलेल्यांनी शांत चित्ताने विचार केला पाहिजे.
 लेखणीला विराम देण्यापूर्वी केवळ  मुस्लीमच नव्हे तर सर्व शांतताप्रेमी समाजप्रिय  बांधवांना एक नम्र विनंती वजा सूचना कराविशी वाटते की,सर्वच महिलांचे बुरखा/हिजाबला मिळत असलेले समर्थन पाहुन अनेक ठिकाणी  बुरखा घालून दुष्कृत्य करताना दिसत आहेत,पकडले जात आहेत.तेव्हा मने कलुषित होऊ न देता  आपण सर्व भुमीपुत्र स्नेहभाव राखू या.इतकेच !

विठ्ठलराव वठारे
अध्यक्ष
जन लेखक संघ, महाराष्ट्र