कोल्हापूर : सौ रेणुताई पोवार
दि .२२ सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल घाटगे (सरकार ) यांचा वाढदिवस दि २२ फेब्रुवारी रोजी जुना बुधवार ,कोल्हापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला महिलांच्या साठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .तसेच महिलांचे विविध कार्यक्रम शिवाजी महाराजांचा पोवाडा गायन करण्यात आला. विविध गटामधुन बक्षिस वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार श्री धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती .
मा. खा. महाडीक यांच्या हस्ते कोराना योद्धाचे सत्कार करण्यात आला. श्री राहुल घाटगे यांनी आपल्या वाढ दिवसा निमत्त प्रभाग क्रमांक 9 मध्ये स्वच्छ व निर्मल काम करण्यासाठी आपली इच्छा व्यक्त केली यावेळी पोलीस कर्मचारी सौ हेमा पाटील महालक्ष्मी टाइम्सच्या कोल्हापूर प्रतिनिधी सौ रेणुताई पोवार तसेच भागातील सर्व कार्यकर्ते व महिला वर्ग यांची उपस्थिती लाभली श्री राहुल घाटगे यांना सर्व महिला वर्गाची तसेच प्रमुख पाहुणे या सर्वानी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देऊन भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.